नवी दिल्ली : सध्या मार्केटमध्ये अनेक गॅजेट्स उपलब्ध आहे. त्यानुसार, युजर्सची संख्याही मोठी आहे. त्यात आता प्रसिद्ध कंपनी Apple कडून आपल्या युजर्ससाठी एक नवं अॅप लाँच केले जाणार आहे. हे साधंसुधं अॅप नाहीतर कामाचं अॅप आहे. Apple आता iPhone आणि MacBook साठी ‘पासवर्ड मॅनेजर ॲप’वर काम करत आहे.
ॲपलच्या पासवर्ड मॅनेजर ॲपलाच ‘पासवर्ड’ असे नाव दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या अनेक पासवर्ड मॅनेजर सामान्यत: युजर्संना मासिक शुल्क आकारतात आणि त्या बदल्यात मजबूत पासवर्ड देतात. पण आता अॅप्पलकडून हे नवं अॅप लाँच करण्याची तयारी केली जात आहे. त्यानुसार, येत्या 10 जून रोजी होणाऱ्या ‘वर्ल्ड वाईड डेव्हलपर्स कॉन्फरन्स’मध्ये ॲपलच्या या ॲपची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
ॲपलकडून यापूर्वीच आयक्लॉड कीचेनसह अशी सुविधा दिली जात आहे. मात्र, असे असले तरी हे वेगळे ॲप नाही. ॲपलचे हे ॲप ॲपलच्या इकोसिस्टमचा एक भाग असेल. ॲपल पासवर्डमध्ये अकाउंट, वायफाय नेटवर्क, वेबसाईट आणि पासकीजसह पासवर्डसाठी अनेक श्रेणी असतील, असेही सांगण्यात आले आहे.