पुणे प्राईम न्यूज डेस्क: एकेकाळची सुपरहिट एसयूव्ही डस्टर नवीन स्वरूपात येणार आहे. नवीन डस्टर ५ आणि ७ सीटर पर्यायांमध्ये येईल. याचे सादरीकरण आगामी ऑटो एक्पो २०२५ मध्ये होणार आहे. याचे इंजिन १.२ आणि १.५ लीटर हायब्रिड इंजिनमध्ये लाँच केले जाऊ शकते. सेफ्टीसाठी यात अँटी-लॉक ब्रेकिंग सरफेस ईबीडी, ६ एअरबॅग्ज, क्रूझ कंट्रोल आणि लेव्हल १ अडास यांचा समावेश असेल.
यामध्ये एक नवीन ग्रिल, नवीन बोनेट आणि बंपर देखील समोर दिसेल. कारचे साईड प्रोफाइल आणि मागील लूक पूर्णपणे बदलला जाईल. नवीन डस्टरचे इंटीरियर आता अधिक प्रीमियम बनवले जाईल. याची स्पर्धा मारुती ब्रेझा, युंदाई क्रेटा आणि किया सेल्टोस तसेच एर्टिगा, किया केरेन्स या गाड्यांबरोबर असणार आहे.