नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यात WhatsApp, Instagram, Facebook या सोशल मीडियाचा युजर वर्ग मोठा आहे. या कंपन्यांकडून आपल्या युजर्ससाठी नवनवे फिचर्स लाँच केले जात आहेत. त्यात आता WhatsApp कडून नवं फिचर लाँच करण्यात आलं आहे.
WhatsApp चं एक असं फिचर लाँच झालंय त्यात आता सगळ्यांना ‘ग्रुप व्हॉईस चॅट’चा लाभ घेता येणार आहे. Meta ने Voice Chat With Large Group लाँच केला आहे. X ट्विटरवर पोस्ट शेअर करण्यात आली. आपण सगळ्यांनी ग्रुप चॅट, ग्रुप व्हिडिओ कॉल, ग्रुप कॉलिंग अशा वेगवेगळ्या फिचर्सचा अनुभव घेतला असेल. पण, या फिचरमध्ये तुम्ही ग्रुपमधील सदस्यांशी लाईव्ह संवाद साधू शकता. तसेच या ग्रुप व्हॉईस चॅटमध्ये 33 ते 128 जण एकत्र संवाद साधू शकतात.
WhatsApp वर ‘व्हॉईस मेसेज’ हा फिचर आधीपासून होताच पण ‘ग्रुप व्हॉईस चॅट’ फिचरचा अनुभव यापेक्षा थोडा वेगळा असणार आहे. यामध्ये तुम्ही एकापेक्षा अनेक लोकांशी आवाजाच्या मदतीने लाईव्ह संवाद साधू शकणार आहात.