नवी दिल्ली : प्रसिद्ध टेक कंपनी Microsoft ने Skype युजर्ससाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता कंपनीच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅप Skype मधून सर्व प्रकारच्या जाहिराती काढल्या आहेत. कॉलिंगच्या वेळी कोणत्याही जाहिरातीमुळे आता Skype युजर्सचे लक्ष वेधले जाणार नाही. यासाठीच कंपनीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
तसेच मायक्रोसॉफ्टने स्काईपसाठी एक नवीन फीचर देखील लाँच केले आहे. एआयद्वारे इमेज निर्मितीमध्ये सुधारणा देखील केली आहे. मायक्रोसॉफ्टने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले की, स्काईपचे नवीन व्हर्जन प्रसिद्ध झाले आहे आणि यापुढे युजर्सची अडचणी कमी होणार आहेत. स्काईपच्या नवीन व्हर्जनची संख्या 8.125.76.201 आहे.
मायक्रोसॉफ्टने पुढे म्हटले की, ‘सर्व स्काईपच्या चॅनेलमधून जाहिराती काढण्यात आल्या आहेत. आता युजर्सला अतिरिक्त जाहिराती दिसणार नाहीत. युजर्स आता स्काईपवर एआय प्रतिमा तयार करण्यास सक्षम असतील. यासाठी एक नवीन अपडेशन लाँचही केले गेले आहे. नवीन अपडेटनंतर युजर्स चॅट विंडोमध्येच एआय प्रतिमा तयार करण्यास सक्षम असतील, असेही म्हटले आहे.