नवी दिल्ली : तुम्ही Skype या मेसेजिंग अॅपबद्दल ऐकले असेल. तुमच्यापैकी काहींनी तर हे अॅप वापरलंही असेल. हे ॲप युजर्संना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा देते. अनेक लोक ऑनलाईन मीटिंगसाठी याचा वापर करतात. पण, आता Microsoft कंपनी Skype हे अॅप बंद करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.
Skype हे अॅप जगातील पहिल्या व्हिडिओ कॉलिंग प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. आता Microsoft आपला व्हिडिओ कॉलिंग प्लॅटफॉर्म Skype कायमचा बंद करण्याचा विचार करत आहे. XDA च्या अहवालानुसार, विंडोजसाठी नवीन स्काईपच्या प्रीव्ह्यूमध्येही असाच मेसेज आहे. Skype हे अॅप मेपासून तुम्हाला वापरता येणार आहे. Skype ने 2017 मध्ये Teams नावाचे नवीन ॲप लाँच केले. Teams चा वापर व्हिडिओ कॉलिंग आणि मेसेजिंगसाठीही केला जातो आणि कंपन्यांमध्ये तो खूप प्रसिद्ध होत आहे.
आता युजर्सने Skype ऐवजी Teams ॲप वापरावे अशी मायक्रोसॉफ्टचा विचार आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्ट स्काईप बंद करण्याचा विचार करत आहे. प्रिव्ह्यूमध्ये दिलेल्या मेसेजनुसार, जे यूजर्स अजूनही स्काईप वापरत आहेत, त्यांना टीम्समधील ॲपवर शिफ्ट करण्यास सांगितले जाईल.
2003 मध्ये लाँच झाले होते Skype
Skype हे अॅप 2003 मध्ये लाँच झाले होते. Microsoft ने 2011 मध्ये ते विकत घेतले. गेल्या काही वर्षांत मायक्रोसॉफ्टने स्काईपची अनेक फीचर्स बंद केली आहेत. आता ते पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.