Saturday, November 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘धर्म बदल, नाहीतर जीवे मारेन!’ पत्नीच्या डोक्यावर कोयत्याने वार; यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 28 November 2026, 17:21

यवत, (पुणे) : हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पतीने पत्नीच्या डोक्यावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बोरीपार्धी (ता. दौंड) येथे घडली. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मौलाअल्ली बाबुलाल शेख असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत 25 वर्षीय विवाहितेने यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही बोरीपार्धी येथे पती व दोन वर्षांच्या मुलासह भाड्याच्या खोलीत राहत आहे. सन 2024 मध्ये बोरीपार्धी येथील एका रुग्णालयात काम करत असताना तिची मौलाअल्ली शेख याच्याशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांचा विरोध असल्याने त्यांनी ठाणे येथे हिंदू रितीरिवाजानुसार विवाह केला. लग्नानंतर दोघे बोरीपार्धी येथे राहू लागले.

लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस पती चांगले वागत होता. मात्र, त्यानंतर हिंदू धर्माचे पालन करण्यावरून वाद घालण्यास सुरुवात झाली. पती मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी वारंवार दबाव आणत होता. धर्मांतरास विरोध केल्यास वाद, मारहाण आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

रविवारी (ता. 22) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी पतीने पुन्हा मुस्लिम धर्म स्वीकारण्यास सांगितले. महिलेने नकार दिल्याने पतीने घरातील कोयत्याने तिच्या डोक्यावर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात तिच्या डोक्याला जखम होऊन रक्तस्राव झाला. तसेच धर्म स्वीकारला नाही तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तिने फिर्यादीत नमूद केले आहे.

दरम्यान, हल्ल्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार घेतले. सुरुवातीला भीतीपोटी तिने दुखापत गाडीवरून पडल्याने झाल्याचे सांगितले. मात्र, पतीकडून होत असलेल्या मारहाण आणि धमक्यांच्या भीतीमुळे यापूर्वी पोलिसांत तक्रार करण्याचे धाडस झाले नसल्याचे तिने स्पष्ट केले. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गाडेकर करीत आहेत.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

‘धर्म बदल, नाहीतर जीवे मारेन!’ पत्नीच्या डोक्यावर कोयत्याने वार; यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Saturday, 28 November 2026, 17:21

आधी सासरच्या चौघांविरोधात तक्रार दाखल केली, 40 मिनिटांतच विवाहितेचा मृत्यू; सोलापुरातील घटना

Saturday, 28 November 2026, 17:14

बुधवार पेठेत FDAची धडक कारवाई; तब्बल 2.88 लाखांची मिठाई नष्ट, 8 दुकानांची तपासणी

Saturday, 28 November 2026, 16:08

पावसाच्या बोगस अंदाजाने शेतकऱ्यांचे नुकसान? पंजाब डख यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल

Saturday, 28 November 2026, 15:52

NCMC कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! 50 रुपयांची अट संपली, आता फक्त 5 रुपयांत होणार रिचार्ज

Saturday, 28 November 2026, 15:41

वाघ्या-मुरळी समाजाच्या मागण्या आता शासनदरबारी पोहोचणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी दिले पाठपुराव्याचे आश्वासन

Saturday, 28 November 2026, 14:32
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp