Saturday, November 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बुधवार पेठेत FDAची धडक कारवाई; तब्बल 2.88 लाखांची मिठाई नष्ट, 8 दुकानांची तपासणी

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 28 November 2026, 16:08

पुणे : सणासुदीच्या काळात मिठाईच्या गुणवत्तेबाबत आणि स्वच्छतेबाबत खबरदारी घेत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) बुधवार पेठ परिसरात तपासणी मोहीम राबवली. या कारवाईत मिठाई तयार करणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या 8 आस्थापनांची पाहणी करण्यात आली. यावेळी नियमांचे उल्लंघन आणि अस्वच्छतेशी संबंधित बाबी समोर आल्या. प्रशासनाने एकूण 512.1 किलो मिठाईचा साठा जप्त करून जागेवरच नष्ट केला. या मिठाईची अंदाजे किंमत 2 लाख 88 हजार 200 रुपये आहे. ही मोहीम अन्न व औषध प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

तपासणीदरम्यान वेगवेगळ्या मिठाईंचे एकूण 17 नमुने प्रयोगशाळेतील विश्लेषणासाठी घेण्यात आले. दोन आस्थापनांकडे आवश्यक परवाना किंवा नोंदणी नसल्याचे आढळल्याने त्यांना व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली.

परिमंडळ 6 अंतर्गत श्रीमंत पेढेवाले या दुकानातून मोतीचूर लाडू, खव्याचे मोदक आणि उकडीचे मोदक असे 3 नमुने घेण्यात आले. येथील 215.1 किलो मिठाईचा साठा नष्ट करण्यात आला. त्याची किंमत 1 लाख 18 हजार 80 रुपये होती.

श्री मंगल मूर्ती या आस्थापनेतून खव्याचे मोदक, तळलेले मोदक आणि बेसन लाडू यांचे नमुने घेण्यात आले. येथील 195 किलो मिठाई, ज्याची किंमत 1 लाख 17 हजार रुपये होती, नष्ट करण्यात आली. या दुकानालाही व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आली.

धारवाडी पेढे स्वीट्स अँड स्नॅक्स येथून 43 किलो, तर परिमंडळ 8 मधील जय गणेश स्वीट सेंटर येथून 35 किलो मिठाई जप्त करून नष्ट करण्यात आली. अथर्व स्वीट सेंटरमध्ये अस्वच्छता आढळल्याने तपासणी करण्यात आली. येथील 24 किलो मिठाईचाही साठा नष्ट करण्यात आला.

हर्षवर्धन मिठाई उत्पादन केंद्र नोंदणी प्रमाणपत्राशिवाय सुरू असल्याचे आढळले. या प्रकरणी 30 नोव्हेंबर रोजी तडजोड अर्ज दाखल करण्यात येणार आहे. श्री कृपा दुग्धालयातून मलाई मोदक पेढा, केशरी मोदक पेढा, कंदी मोदक पेढा आणि म्हशीच्या दुधाचे नमुने घेण्यात आले.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

बुधवार पेठेत FDAची धडक कारवाई; तब्बल 2.88 लाखांची मिठाई नष्ट, 8 दुकानांची तपासणी

Saturday, 28 November 2026, 16:08

पावसाच्या बोगस अंदाजाने शेतकऱ्यांचे नुकसान? पंजाब डख यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल

Saturday, 28 November 2026, 15:52

NCMC कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी! 50 रुपयांची अट संपली, आता फक्त 5 रुपयांत होणार रिचार्ज

Saturday, 28 November 2026, 15:41

वाघ्या-मुरळी समाजाच्या मागण्या आता शासनदरबारी पोहोचणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी दिले पाठपुराव्याचे आश्वासन

Saturday, 28 November 2026, 14:32

निकृष्ट कामे करणाऱ्या अभियंत्यांची आता खैर नाही! पुणे महापालिकेचा नवा नियम; बिल काढण्याआधी गुणवत्ता तपासणी बंधनकारक

Saturday, 28 November 2026, 14:29

उजनीवरील प्रस्तावित प्रकल्पांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार! हजारोंच्या संख्येने शेतकरी-मच्छीमार एकवटले

Saturday, 28 November 2026, 14:22
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp