नवी दिल्ली : सध्या अनेक गॅजेट्स लाँच केले जात आहे. त्यात आता Meta आपला नवा स्मार्ट चष्मा मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत आहे. या चष्म्याच्या माध्यमातून काही क्षणांत भाषांतर केलेला कंटेट आपल्याला मिळू शकणार आहे.
Meta ने रे-बन स्मार्ट ग्लासेस लवकरच रिअल-टाईममध्ये विविध भाषांचे भाषांतर करण्यास सक्षम असणार आहे. यामुळे चष्मा स्पीकरमधून कोणत्याही भाषेत ऐकता येईल, यामुळे तुम्हाला इतर भाषा येत नसल्या तरी या चष्म्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांशी बोलणे सोपे होणार आहे. हा चष्मा कोणत्याही भाषेचे इंग्रजीत भाषांतर करू शकतो आणि आपण चष्मा स्पीकर्समधून ते ऐकू शकता.
आपण जर स्पॅनिश, फ्रेंच किंवा इटालियन बोलणाऱ्या एखाद्या व्यक्तीसोबत बोलत असाल तर चष्मा त्वरित ती भाषा इंग्रजीत भाषांतरित करतो. यामुळे आपण समजू शकाल आणि प्रतिसाद देऊ शकाल. भविष्यात आणखी भाषांना यात समाविष्ट करण्याचा मेटाचा पुढचा प्लॅन आहे. जेणेकरून हे चष्मे प्रवासी आणि विविध भाषा बोलणाऱ्या लोकांसाठी अधिक उपयुक्त ठरतील.