मुंबई : मेटातर्फे आता भारतात फेसबुक आणि इन्स्टाग्राम करता विशेष मेटा व्हेरिफाईड सबस्क्रिप्शन प्लान्सची सुरुवात केली आहे. कंपनीतर्फे प्रथमच गेल्या वर्षी मेटा व्हेरिफाईड फॉर बिझनेसची सुरुवात छोट्या प्रमाणावर केली होती. यामध्ये कशा प्रकारे मेटा उपयोग करून मूल्यवान अशा सबस्क्रिप्शन टूलकिट्सचा वापर करून व्यवसायांना अधिक लाभ हा या अॅप्सवरून करता येऊ शकतो का, याची तपासणी केली होती.
गेल्या महिन्यात कन्व्हर्सेशन कॉन्फरन्समध्ये चाचणी केल्यानंतर व्हॉट्सअॅपवरूनही मेटा व्हेरिफाईड बिझनेस योजना सुरू करत असल्याची घोषणा केली होती. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील मेटा व्हेरिफाईड बिझनेस उत्पादनांमध्ये बॅजेससह सुधारित अकाऊंट सपोर्टसह अधिक वैशिष्ट्ये उपलब्ध करून देणार आहे. भारतातील सबस्क्रिप्शन प्लान्स हे सध्या के वळ आयओएस आणि अँड्रॉईडच्या माध्यमातून फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा व्हॉट्सअॅपवरच उपलब्ध असणार आहेत.