नवी दिल्ली: फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरताना अनेक युजर्सना अडचणी येत आहेत. मंगळवारी रात्री (५ मार्च २०२४) फेसबुक आणि इंस्टाग्राम अचानक बंद झाले. वापरकर्त्यांची खाती आपोआप लॉग आउट होत आहेत.
मंगळवारी संध्याकाळी मेटा सर्व्हर डाऊन झाले आहे. या काळात फेसबुक, इन्स्टाग्राम आणि थ्रेडच्या वापरकर्त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याचा परिणाम भारतासह जगातील अनेक देशांमध्ये दिसून येत आहे.
वापरकर्त्याचे खाते आपोआप लॉग आउट होत आहे. यानंतर त्यांना लॉग इन करण्यात अडचणी येत आहेत. मात्र, व्हॉट्सॲपवर कोणताही परिणाम झालेला नाही. जेव्हा लोक लॉग इन करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांच्या मेलवर ओटीपी पाठविला जाईल असे सांगितले जात आहे. परंतु, वैयक्तिक तपशील देखील चुकीचे दर्शवित आहेत. डाउन डिटेक्टरच्या मते, रात्री 8.30 नंतर समस्या सुरू झाली आणि आतापर्यंत सुरू आहे. कंपनीकडून अद्याप कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही. तथापि, काही आयफोन वापरकर्त्यांना या समस्येचा सामना करावा लागत नाही.
Meta’s Facebook & Instagram are down in India and many other parts of the world. More details awaited.
— ANI (@ANI) March 5, 2024