नवी दिल्ली : सध्या मार्केटमध्ये अनेक साधारण कारपासून ते आलिशान कार उपलब्ध आहेत. त्यात आता Mercedes ने आपली नवी आलिशान कार लाँच केली आहे. Mercedes Benz India ने GLE 300d 4MATIC मध्ये एक नवीन AMG लाइन ट्रिम लाँच केली आहे, जी लक्झरी SUV ला स्पोर्टियर लूकमध्ये उपलब्ध आहे.
नवीन मर्सिडीज-बेंझ GLE 300d 4MATIC AMG लाईनची किंमत 97.85 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. सध्या विकल्या जात असलेल्या प्रोफेशनल लाईन ट्रिमच्या ऐवजी आता या कारला चांगली पसंती मिळेल, असा कंपनीचा अंदाज आहे. कंपनीने यापूर्वी GLE 450d आणि GLE 450 मॉडेलमधील AMG लाईन लाँच केली आहे.
GLE 300d 4MATIC AMG लाईनला 2.0-लिटर चार-सिलेंडर डिझेल इंजिन देण्यात आले असून, हे इंजिन 265 bhp पॉवर आणि 550 Nm पीक टॉर्क जनरेट करते. युनिट 48-व्होल्ट सौम्य-हायब्रिड इंटिग्रेटेड स्टार्टर-जनरेटर (ISG) सह जोडलेले आहे जे 20 bhp आणि 220 Nm पॉवर निर्माण करते. या कारलाही चांगली पसंती मिळेल, असा कंपनीचा अंदाज आहे.