नवी दिल्ली : सध्या अनेक सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. या वाढत्या वापरामुळे कंपन्यांकडूनही आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिचर्स आणले जात आहेत. त्यात आता प्रसिद्ध सोशल मीडिया साईट X (पूर्वीचे ट्विटर) वर आता लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी पैसे मोजावे लागणार आहे. फक्त प्रीमियम युजर्संनाच X वर लाईव्ह स्ट्रिमिंग करता येणार आहे.
X वर लाईव्ह स्ट्रीमिंग करताना यापूर्वी कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. मात्र, आता ही सर्व सेवा शुल्कासह मिळणार आहे. त्यातच प्रीमियम युजर्संनाच X वर लाईव्ह स्ट्रीमिंग करता येणार आहे. असे जरी असले तरी Instagram, Facebook, YouTube या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युजर्सना मोफत लाईव्ह स्ट्रीमिंग करता येणार आहे.
X वर हे बदल कधीपासून लागू केले जाणार आहेत, याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही. X चे प्रीमियम सबस्क्रिप्शन 215 रुपये प्रति महिनापासून सुरू होते आणि प्रीमियम + टियरसाठी युजर्सना 1,133 रुपये मोजावे लागतात. मात्र, आता X वर लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यासाठी देखील पैसे मोजावे लागणार असल्याने प्रीमियम सबस्क्रिप्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.