पुणे प्राईम न्यूज डेस्क : प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक्स आणि स्मार्टफोन निर्माता कंपनी एलजीकडून अनेक मोबाईल, वॉशिंग मशीन, फ्रिज आदी वेगवेगळी उत्पादने निर्मिती केली जात आहे. आता कंपनीने सगळ्यात मोठ्या टेक शोमध्ये म्हणजेच कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो 2024 मध्ये जगातील पहिल्या पारदर्शक अर्थात ट्रान्स्परंट ओएलईडी टीव्ही लाँच केला आहे.
एलजीने सीईएस 2024 मध्ये कंपनीने ओएलईडी (OLED) इनोव्हेशन्ससह एलजी जगातील पहिल्या वायरलेस पारदर्शक टीव्ही लाँच केला आहे. एलजी कंपनीच्या ओएलईडी टी नावाच्या या टीव्हीमध्ये डिस्प्लेवर एक ग्लास आहे; जो टीव्ही बंद करताच तुम्हाला दिसणार नाही. टीव्ही पारदर्शक आणि वायरलेस एव्ही ट्रार्नस्मशन तंत्रज्ञानाने परिपूर्ण आहे. टीव्हीमध्ये सेल्फ-लिट पिक्सेल तंत्रज्ञान आहे; जे टीव्हीवर दिसणाऱ्या चित्रांची गुणवत्ता आणि त्याचे 4k रिझो रिझोल्युशन सुरक्षित ठेवण्यास मदत करतो.
तसेच एलजी मॉडेल ओएलईडी टी (OLED T) मध्ये काळा आणि पारदर्शक दोन स्क्रीन मोड असणार आहेत. पारदर्शक मोडमध्ये टीव्हीच्या मागे असणाऱ्या वस्तूंवर टीव्हीतील दृश्य पाहण्याचा अनोखा अनुभव मिळेल. तसेच जर तुम्हाला ट्रॅडिशनल स्टाईलमध्ये टीव्ही पाहायचा असेल, तर तुम्ही रिमोट कंट्रोलवर क्लिक करून स्क्रीन काळ्या रंगातसुद्धा बदलू शकणार आहेत.