नवी दिल्ली : लिनोवो कंपनीने आपला नवीन लॅपटॉप Lenovo Xiaoxin Air 14-2023 रायझेन एडिशन लॉन्च केला आहे. हा लॅपटॉप AMD R7 7840U प्रोसेसरसह मिळत आहे. यात 120Hz रिफ्रेश रेटसह 14-इंचाचा 2.8K डिस्प्ले असून, जो स्मूथ व्हिज्युअल्स देतो. यात 2880×1800 रिझोल्यूशन, 16:10 आस्पेक्ट रेशो, 242 ppi, 400 nits ब्राइटनेस आणि पूर्ण sRGB कलर कव्हरेजही आहे.
Lenovo Xiaoxin Air 14 या लॅपटॉपमध्ये 16 GB ड्युअल-चॅनल मेमरी आणि 1TB SSD स्टोरेज आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, यात ड्युअल USB-C पोर्ट, एक USB-A पोर्ट आणि HDMI समाविष्ट आहे. त्याची जाडी 14.9 मिमी ते 15.9 मिमी पर्यंत आहे. यात फेस रेकग्नायझेशन सिस्टिम असून, 1080p कॅमेरा आहे. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे कोणी त्याच्या जवळ आल्यावर त्याची लॉकस्क्रीन आपोआप सक्रिय होते.
लॅपटॉपमध्ये टू-वे नॉइज कॅन्सलेशन उपलब्ध आहे. मजबूत आवाज गुणवत्तेसाठी, यात डॉल्बी ॲटमॉससह चार-स्पीकर सिस्टिम देण्यात आली आहे. यामध्ये फास्ट चार्जिंग सपोर्टसह 65Wh बॅटरी आहे, जी 17 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप देते.