नवी दिल्ली : प्रसिद्ध टेक्नॉलॉजी कंपनी Lenovo ने आपला नवा Legion हा Tablet लाँच केला आहे. या Tab अनेक बेस्ट ऑप्शन असून, यातून बेस्ट असा गेमिंग एक्सपिरिअन्स घेता येणार आहे. हा Tab मॉनिटर, हेडसेट, माउस आणि कीबोर्डशी कनेक्ट करता येऊ शकणार आहे.
Lenovo कंपनीने आपल्या नवीन Legion Tab च्या बाहेरील बाजूस डिस्प्लेसह सहजपणे कनेक्ट होण्यासाठी ते DisplayPort 1.4 ही देण्यात आला आहे. या टॅबमध्ये 8.8-इंचाचा QHD+ डिस्प्ले देण्यात आला असून, ज्यामध्ये 144 Hz रिफ्रेश रेट आणि 500 nits पर्यंत ब्राइटनेस आहे. यात Qualcomm Snapdragon 8+ Gen 14nm प्रोसेसरही देण्यात आला आहे, जो 12GB LPDDR5X रॅम आणि 256GB ऑनबोर्ड स्टोरेजसह येतो.
या स्टोरेजच्या मदतीने तुम्ही स्टोरेज 1TB पर्यंत वाढवू शकता. यात 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि मागील बाजूस 2-मेगापिक्सलचा डबल मॅक्रो कॅमेरा देखील देण्यात आला आहे. याशिवाय, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी, तुम्हाला 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात Qualcomm Quick Charge 3.03 तंत्रज्ञान आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6550 mAh बॅटरी आहे.