नवी दिल्ली : सध्या मार्केटमध्ये अनेक स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. त्यात भारतातील प्रसिद्ध कंपनी Lava आपला नवा Blaze Duo लवकरच होणार लाँच करणार आहे. Lava च्या या स्मार्टफोनमध्ये दोन स्क्रीनसह 64 MP कॅमेराही मिळणार आहे. यातील विशेष बाब म्हणजे हा स्मार्टफोन 20 हजारांपेक्षाही कमी किमतीत उपलब्ध असणार आहे.
Lava कंपनी पुढील आठवड्यात ड्युअल स्क्रीन स्मार्टफोन Lava Blaze Duo लाँच करणार आहे. यामध्ये आपल्याला Lava Agni 3 सारखे डिझाईन पाहिला मिळणार आहे. यात दोन डिस्प्ले असणार आहे, जो मागील पॅनलवर कॅमेरासह असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये AMOLED डिस्प्ले, पॉवरफुल प्रोसेसर आणि दमदार बॅटरीही दिली जाणार आहे. Lava चा हा फोन 16 डिसेंबरला दुपारी 12 वाजता लाँच केला जाणार आहे.
हा स्मार्टफोन ॲमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. तुम्ही ते आर्क्टिक व्हाईट आणि सेलेस्टियल ब्लू या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकाल. त्याच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती अद्याप दिली गेली नाही. पण, हा फोन 20 हजारांपेक्षाही कमी किमतीत उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले आहे.