नवी दिल्ली : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Lava ने आपला नवा O3 Pro स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक अत्याधुनिक असे फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीही दिली गेली आहे. यातील खास बाब म्हणजे हा स्मार्टफोन 7 हजारांपेक्षाही कमी किमतीत मिळणार आहे.
Lava O3 Pro हा फोन UniSoC प्रोसेसरसह चालतो. यात LCD स्क्रीन, सेंटर पंच होल कटआउट आणि 50MP कॅमेरा आहे. हा फोन फक्त 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजमध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 6,999 रुपये असून, फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन तीन कलर ऑप्शनमध्ये मिळत आहे. ग्लॉसी ब्लॅक, ग्लॉसी पर्पल आणि ग्लॉसी व्हाईट असणार आहे. याशिवाय, यात AI लेन्सही आहे. कंपनीने 8MP सेल्फी कॅमेराही दिला आहे.
Lava O3 Pro मध्ये 6.56-इंचाचा LCD पॅनेल आहे, जो HD+ रिझोल्यूशनसह येतो. यात 90Hz रिफ्रेश रेट आणि सेंटर पंच होल कटआउट आहे. डिव्हाईस UniSoC T606 प्रोसेसरवर काम चालतो. यात 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असेल. तुम्ही मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवू शकता.