नवी दिल्ली : सध्या अनेक स्मार्टफोन्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार यामध्ये अनेक बदल करून विविध फीचर्सही दिले जात आहेत. असे असताना प्रसिद्ध कंपनी Lava ने आता दोन डिस्प्ले असणारा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कंपनीकडून या फोनबाबत सांगितले जात होते. मात्र, आता कंपनीने स्मार्टफोन लाँच केला आहे.
गेल्या वर्षी लाँच झालेल्या Agni 2 च्या कंपनीने हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून, यामध्ये AMOLED डिस्प्ले, पॉवरफुल प्रोसेसर आणि इतर फीचर्स आहेत. Lava ने हा फोन दोन कॉन्फिगरेशनमध्ये लाँच केला आहे. त्याच्या 8GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 20,999 रुपये आहे. मात्र, कंपनीकडून या स्मार्टफोनवर कोणत्याही प्रकारे चार्जर दिले जात नाही.
जर तुम्ही चार्जरसह स्मार्टफोन खरेदी केल्यास त्याची किंमत 22,999 रुपये असेल. फोनसोबत 66W चा चार्जर उपलब्ध असेल. या स्मार्टफोनमध्ये 8GB RAM + 256GB स्टोरेजही देण्यात आला आहे. याची किंमत 24,999 रुपये असणार आहे. यासोबत तुम्हाला चार्जर मिळेल. तुम्ही Amazon वरून 499 रुपयांमध्ये स्मार्टफोनची प्री-ऑर्डर करू शकता. त्याची विक्री 9 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.