नवी दिल्ली : सध्या स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे या स्मार्टफोनची सुरक्षा खूप महत्त्वाची झाली आहे. फोनद्वारे केवळ कॉल आणि मेसेजच नाही तर अनेक महत्त्वाची कामे करता येतात. पण अनेकदा तुमचा स्मार्टफोन कोणीही बंद अर्थात Switch Off करू शकत होतं. मात्र, आता असं होणार नाही. कारण, अशी एक ट्रिक आहे त्याचा अवलंब केल्यास तुमच्याशिवाय कोणीही तुमचा फोन Switch Off करू शकणार नाही.
फोन बंद करण्यापूर्वी पासवर्ड टाकणे आवश्यक आहे. पण हा पासवर्ड कसा सेट करायचा हे जर माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला याची माहिती देत आहोत…
– सर्वप्रथम तुम्हाला फोनच्या सेटिंगमध्ये जावे लागेल.
– यानंतर तुम्हाला सर्च बारमध्ये पासवर्ड लिहावा लागेल.
– प्रत्येक फोनची सेटिंग्ज वेगळी असतात, त्यामुळे काही उपकरणांमध्ये या फिचर्सला ‘पॉवर ऑफ’ म्हटले जाऊ शकते.
– सर्च बारमध्ये सर्च केल्यानंतर तुम्हाला पॉवर ऑफसाठी आवश्यक पासवर्डचा पर्याय मिळेल. हे फिचर्स केवळ काही स्मार्टफोनमध्ये आहे.
– पॉवर ऑफसाठी पासवर्ड आवश्यक असलेल्या पर्यायावर क्लिक करा.
– यानंतर फोनच्या लॉक स्क्रीनचा पासवर्ड टाकावा लागेल.
– हे केल्यानंतर तुमच्या फोनची लॉक स्क्रीन एंटर करा आणि नंतर जेव्हा कोणी तुमच्या परवानगीशिवाय फोन बंद करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा त्याला पासवर्ड टाकावा लागेल.