पुणे प्राईम न्यूज डेस्क: हॉटेल असो किंवा ट्रायल रूम तिथं जाताना महिला वर्ग काळजी घेतात. पण त्यांना सर्वात मोठी चिंता असते ती कुठं छुपा कॅमेरा तर नाही ना…मागील काही वर्षांपासून भारतासह जगभरात महिला कपडे बदलत असलेल्या ठिकाणी छुपा कॅमेरा अर्थात हिडन कॅमेरा लावण्याचे गैरप्रकार घडलेले आहेत. मात्र, सध्या टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली की सर्वकाही क्षणात दिसू शकतं. पण आपल्याला त्याची माहिती असणं गरजेचे असतं. याचीच माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत…
हॉस्टेल, हॉटेल, शॉपिंग मॉल किंवा असे ठिकाण जिथे महिला राहतात, कपडे बदलतात किंवा वॉशरूमला जातात, अशा ठिकाणी छुपा कॅमेरा लावला जाण्याची शक्यता असते. बहुतांश वेळा पंखा, बेड, बल्बचे होल्डर, नाईट लॅप, ड्रेसिंग टेबलचा आरसा, एखादा शोपीस, पुस्तके, भिंतीच्या आत, टिशू बॉक्स, खेळणी, टीव्ही बॉक्स, पेन किंवा भिंतींवरील सजावटीच्या साहित्यांमध्ये हिडन कॅमेरा लावला जाण्याची शक्यता असते. हॉटेलमध्ये एंट्री केल्यावर छुपे कॅमेरे शोधणे गरजेचे आहे.
अनपेक्षित वस्तूंकडे बारकाईने लक्ष द्या…
हॉटेलच्या खोलीत छुपे कॅमेरे तपासण्याची पहिली पायरी म्हणजे तेथे ठेवलेल्या कोणत्याही असामान्य वस्तू किंवा उपकरणांचे बारकाईने निरीक्षण करा. लोक अशा वस्तूंमध्ये कॅमेरे लपवू शकतात. या असामान्य वस्तूंमध्ये स्मोक डिटेक्टर, घड्याळ रेडिओ, आरसे किंवा इलेक्ट्रिकल आउटलेटचा समावेश आहे.
कॅमेरा डिटेक्टरचा करता येऊ शकतो वापर
खोलीत कोणतेही छुपे कॅमेरे नाहीत याची तुम्हाला पूर्ण खात्री हवी असेल तर तुम्ही कॅमेरा डिटेक्टर वापरू शकता. इन्फ्रारेड प्रकाश शोधून, ही उपकरणे उघड्या डोळ्यांना न दिसणाऱ्या कॅमेऱ्यांची माहिती देखील देतात. आपण ते ऑनलाईन किंवा इलेक्ट्रॉनिक्स स्टोअरमधून खरेदी करू शकता.
Wi-Fi नेटवर्क शोधा
बहुतेक कॅमेरे नेटवर्कशी जोडलेले असतात, जेणेकरून ते दूरस्थपणे प्रवेश करता येतील. हॉटेल वाय-फाय सेवा देत असल्यास, तेथे कोणतेही कॅमेरे आहेत की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही नेटवर्कशी कनेक्ट करू शकता. हे करण्यासाठी, फक्त तुमच्या डिव्हाईसवर उपलब्ध Wi-Fi नेटवर्क शोधा आणि कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळल्यास त्वरीत योग्य ती पावले उचला.