पुणे प्राईम न्यूज: व्हॉट्सॲपने काही दिवसांपूर्वीच चॅनल फीचर लाँच केले आहे. व्हॉट्सॲपचे चॅनेल फीचर भारतात हिट झाले आहे. अनेक मीडिया हाऊस आणि सेलिब्रिटी व्हॉट्सॲप चॅनलशी जोडलेले आहेत. व्हॉट्सॲप चॅनलही टेलीग्राम चॅनलप्रमाणेच आहे. या चॅनेलद्वारे एकतर्फी संवाद आहे, याचा अर्थ तुम्ही कोणत्याही मेसेजला उत्तर देऊ शकत नाही. अनेकांनी व्हॉट्सॲप चॅनेल तयार केले आहेत. तुम्ही देखील त्यापैकी एक असू शकता. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनेलचे नाव कसे एडिट करायचे ते सांगणार आहोत…
व्हॉट्सॲप चॅनेल म्हणजे काय ?
सर्व प्रथम आपण व्हॉट्सॲप चॅनेल म्हणजे काय आहे ते जाणून घेऊया. व्हॉट्सॲपच्याच ब्रॉडकास्ट फीचर्सचा हा विस्तारित प्रकार आहे. चॅनेल हे एक-मार्गी प्रसारण साधन आहे, जे ऍडमिन टेक्स्ट, फोटो, व्हिडिओ, स्टिकर्स आणि व्होट्स पाठवू शकतात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही चॅनेल फॉलो करू शकता.
एयासाठीसर्च डायरेक्टरी देखील आहे. ज्यामध्ये तुम्ही तुमचे छंद, क्रीडा संघ, स्थानिक अधिकारी यांच्याबद्दल अपडेट्स मिळवू शकाल. व्हॉट्सॲप चॅनल अॅडमिन किंवा इतर फॉलोअर्सचे फोन नंबर दिसणार नाहीत. तुम्ही कोणत्या चॅनेलचे अनुसरण करू इच्छिता हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून असेल आणि तुमची निवड खाजगी राहील.
व्हॉट्सॲप चॅनेलचे नाव कसे संपादित करावे?
- सर्व प्रथम तुमचे व्हॉट्सॲप ओपन करा.
- आता चॅनेलच्या नावावर क्लिक करा आणि पेज इन्फोवर जा.
- आता चॅनेल इन्फोवर क्लिक करा आणि नाव बदला.
- नाव एडिट केल्यानंतर, चेक मार्कवर क्लिक करा.
हेही वाचा:
इंग्रजांची चाकरी केली म्हणूनच यशोमती ठाकूर यांच्या कुटुंबाला ठाकुरांची पदवी : खासदार अनिल बोंडे
आप नेत्यांवर ईडीची कारवाई सुरूच, जवळच्या व्यक्तींच्या डायरीवरून अमानतुल्ला खान रडारवर
टीम इंडियाची चिंता वाढली: शुभमन गिल प्लेटलेट कॉउंट कमी झाल्याने रुग्णालयात दाखल