पुणे प्राईम न्यूज: आपण अनेकदा गुगलवर अशा गोष्टी शोधतो, ज्याबद्दल आपल्याला माहिती नसते. या शोधात लोकांची माहितीही गोळा केली जाते. उदाहरणार्थ, जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल कोणतीही माहिती गोळा करायची असेल, तर तुम्ही त्याचे नाव गुगलवर सर्च केले की, त्याचे सोशल मीडिया प्रोफाइल, फोटो आणि इतर डेटा तुमच्या समोर येतो. अनेक वेळा ही वैयक्तिक माहितीही तुमच्यासाठी अडचणीचे कारण बनते.
गुगल सर्चमध्ये तुमच्याबद्दल अशी माहिती येत असेल आणि तुम्हाला ही माहिती गुगलवरून काढून टाकायची असेल, तर आम्ही तुम्हाला त्याबद्दल काही सोप्या युक्त्या सांगणार आहोत. याचा वापर करून तुम्ही गुगलवरून तुमची माहिती कायमची हटवू शकता.
गुगलने नुकतीच युजर्ससाठी ‘Results About You’ ही सुविधा सुरू केली आहे. हे फिचर गुगलवरून वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती काढून टाकण्यासाठी डिझाइन केले आहे. या फीचर्सच्या मदतीने तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती स्वतः काढून टाकू शकता. यासाठी तुम्हाला गुगल सपोर्ट पेजवर जावे लागेल. त्यानंतर सर्च रिझल्टमधून तुम्हाला जी URL काढायची आहे, त्याचा उल्लेख करणारा फॉर्म भरा. तुम्ही या फॉर्ममध्ये एकाच वेळी अनेक URL देखील जोडू शकता. यानंतर गुगल ही पेजेस व्हेरिफाय करेल आणि जर तुम्ही दिलेली माहिती बरोबर असेल तर ती बंद केली जाईल. तथापि, या प्रक्रियेस थोडा वेळ लागू शकतो.
अशा प्रकारे माहिती वेबसाइटवरून थेट हटवा
वैयक्तिक माहिती काढून टाकण्याचा दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही थेट त्या पेजवर जाऊन माहिती काढून टाकण्याची विनंती करू शकता. यासाठी तुम्हाला URL च्या शेजारी असलेल्या तीन ठिपक्यांवर क्लिक करावे लागेल. नंतर या रिझल्टसच्या पेजवर जावे लागेल. येथून रिमूव्ह रिझल्ट या पर्यायावर क्लिक करा. यानंतर पेज काढण्याची प्रक्रिया सुरू होईल.
अशी ट्रेक करा रिक्वेस्ट
या दोन्ही प्रक्रियेनंतर तुम्ही तुमच्या विनंतीचा मागोवा घेऊ शकता. यासाठी तुम्हाला गुगल अॅपवर जाऊन रिझल्ट्स अबाऊट यू वर जावे लागेल. नंतर तुमच्या प्रोफाईल फोटोवर क्लिक करून तुम्हाला रिक्वेस्टचे स्टेटस बघता येईल. एवढेच नाही तर रिक्वेस्ट स्टेटस पाहण्यासोबतच तुम्ही नवीन रिमूव्ह रिक्वेस्ट देखील जोडू शकता.
हेही वाचा:
फिरकीपुढे कांगारुंचे लोटांगण, ऑस्ट्रेलियाची 199 धावांपर्यंत मजल
शेतकऱ्यांना पिक कर्ज वेळेत न दिल्याने भाजप नेत्यानी लगावली बँक कर्मचाऱ्याच्या कानशिलात