नवी दिल्ली : सध्या रोख व्यवहारांपेक्षा ऑनलाईन व्यवहारांना प्राधान्य दिलं जातं. त्यात सर्वाधिक वापर हा गुगल पे, फोन पे यांसारख्या डिजिटल माध्यमांचा केला जातो. मात्र, हा ऑनलाईन व्यवहार करताना अनेकदा आपला UPI आयडी काय आहे हे माहिती नसते. पण आम्ही तुम्हाला आज त्याविषयीच माहिती सांगणार आहोत…
सध्याच्या घडीला यूपीआय हे एक असे माध्यम बनले आहे, ज्याच्या माध्यमातून देशभरात कुठेही झटपट पैसे ट्रान्सफर करता येतात. देशातील कोट्यवधी लोक यूपीआयचा वापर करताना दिसत आहेत. हा यूपीआय आयडी शोधण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनवरील गुगल पे, फोन पे किंवा जे अॅप तुम्ही वापरत असाल ते उघडावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला अॅपच्या स्क्रीनच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात तुमच्या प्रोफाईल पिक्चर असलेल्या ठिकाणी टॅप करावे लागेल. आता यूपीआय सेटिंग्जवर क्लिक करावे लागले. त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी संबंधित यूपीआयआयडी तुम्हाला दिसेल.
जर तुम्हाला पेटीएमवर हा आयडी शोधायचा असेल तर सर्वात आधी मोबाईलमधील पेटीएम अॅप उघडा. आता पेटीएम अॅपच्या स्क्रीनच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या प्रोफाईल पिक्चरवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या क्यूआर कोडच्या वर तुमचा यूपीआय आयडी दिसेल.