नवी दिल्ली : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Oppo आपला नवा Oppo Pad Air 2 हा 11 इंच डिस्प्ले असणारा टॅबलेट लवकरच लाँच करत आहे. हा टॅबलेट MediaTek Helio प्रोसेसरसह येत असून, या टॅबलेटमध्ये फास्ट चार्जिंगही सपोर्ट आहे. Oppo च्या या टॅबलेटचा लूक ‘वनप्लस पॅड गो अँड्रॉइड टॅबलेट’सारखा आहे.
Oppo Pad Air 2 मध्ये अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. हा टॅबलेट स्पेस ग्रे आणि स्ट्रीमर सिल्व्हर कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असणार आहे. Oppo Pad Air 2 मध्ये 2.4k रेझोल्यूशनसह 11.3-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याची कमाल ब्राइटनेस 400nits आहे. Oppo च्या या नवीन Android टॅबलेटमध्ये 8000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच Oppo Pad Air 2 मध्ये 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेजसह ऑक्टा-कोर MediaTek Helio G99 प्रोसेसर आहे.
याशिवाय, 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. या टॅबलेटच्या मागील आणि पुढील दोन्ही बाजूस 8MP कॅमेरा देण्यात आला आहे. या टॅबलेटची विक्री 25 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून, याची किंमत 1,299 युआन म्हणजेच अंदाजे 15,269 रुपये ठेवण्यात आली आहे.