नवी दिल्ली : सध्या फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियाचा वापर वाढत आहे. WhatsApp हे एक असे अॅप आहे; जे तुम्हाला प्रत्येकाच्या फोनमध्ये पाहायला मिळेल. WhatsApp च्या माध्यमातून अनेक कामे सोपी झाली आहेत. त्यामुळे कंपनीकडून आपल्या युजर्ससाठी अनेक नवंनवे फिचर्स आणली जात आहेत. त्यात आता स्टेट्ससंदर्भात माहिती समोर आली आहे.
आता WhatsApp कंपनीने स्टेट्ससाठी खास अपडेट आणलं आहे. या फीचरचे वैशिष्ट्य म्हणजे आता युजरचे स्टेट्स पाहण्यासाठी त्याच्या प्रोफाईलवर टॅप करण्याची गरज भासणार नाही. तर, चॅटमध्येच युजरने लिहिलेल्या मजकुराचे स्टेट्स पाहू शकणार आहात. चॅटमध्ये जिथे युजरचा डीपी असतो; अगदी त्याच्या बाजूला सेव्ह केलेले युजरचे नाव दिसते. इथेच युजरच्या नावाखाली मजकुरात लिहिलेले स्टेट्स दिसत आहे.
जेव्हा तुम्ही ऑफलाईन असाल तेव्हा लास्ट सीन आणि युजरचा स्टेट्स असे असे तुम्हाला अल्टरनेट दिसून येईल. तसेच WhatsApp सेटिंगमध्ये जाऊन हा बदल अगदी सहज करू शकता. या फीचरमुळे युजर्सना WhatsApp युजरच्या प्रोफाईलवर टॅप न करता, अगदी सहजपणे मजकुरातील स्टेट्स पाहता येणार आहे. हे नवीन फीचर सर्व अॅण्ड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध करून दिले जात आहे.