मुंबई : भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असणाऱ्या Reliance Jio चं नेटवर्क गेल्या 1 तासापासून ठप्प आहे. त्यामुळे युजर्सना मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेकांनी याबाबत सोशल मिडीयावर पोस्ट करत Reliance Jio ला टॅग केलं आहे. Reliance Jio चं नेटवर्क गेल्या 1 तासापासून डाऊन आहे.
Downdetector या वेबसाइटनुसार जिओ नेटवर्क विषयी तक्रारी आज सकाळी 11 वाजल्यापासून येऊ लागल्या आहेत. आतापर्यंत हजारो लोकांनी जिओ नेटवर्क उपलब्ध नसल्याचे रिपोर्ट केलं आहे. यातील 67 टक्के लोकांनी सिग्नल नसल्याची तक्रार केली आहे. तर 19 टक्के लोकांना इंटरनेट वापरता येत नाही, तसेच 14 टक्के लोक जीओ फायबर वापरू शकत नाहीत.
मुंबईत जिओचं नेटवर्क अचानक डाऊन झाल्याने सोशल मीडियातून नेटीझन्सने जिओसह अंबानींना ट्रोल केलंय. ट्विटरवर काहींनी पोस्ट करत जिओबद्दल अंबानींना ट्रोल करण्यास सुरुवात केली. तर, अनेकानी तक्रारी दाखल केल्या आहेत. मुंबईत राहणाऱ्या अनेकांनी ट्विटरवर स्क्रीनशॉट शेअर करत जिओचं नेटवर्क गंडल्याचा पुरावाच दिला आहे.
जिओचं नेटवर्क गायब झाल्याने ना फोन कॉल्स सुरू होते, ना इंटरनेट सेवा, त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. देशभरातील युजर्स जिओची सेवा बंद असल्याच्या तक्रारी करत आहेत. X वर Jio देखील खाली ट्रेंड करत आहे. लोक जिओसाठी मीम्स शेअर करत आहेत.