नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी JBL ने नवीन ओपन वायरलेस Yinyue Fan ऑडिओ ग्लासेस लाँच केले आहेत. हे ग्लासेस प्रवासात वापरता येतात. यामुळे कॉलही करता येतो. हे ग्लासेस पूर्णपणे नवीन स्टायलिश आणि फंक्शनल ऑप्शन देतात. यात पारदर्शक डिजाइन आणि स्पष्ट आवाज गुणवत्तेसाठी कस्टम लीनियर ट्रॅक-टाईप ड्राइवर युनिट आहे.
Yinyue Fan ऑडिओ ग्लासेसमध्ये अनेक विशेष असे फिचर्स देण्यात आले आहेत. यात ‘डायरेक्शनल साऊंड फील्ड सिस्टिम डिलिव्हरी’ तंत्रज्ञान साउंड लिकेज कमी करण्यासाठी डिझाईन केले आहे. या माध्यमातून स्पष्ट कम्युनिकेशनसाठी ड्युअल बीमफॉर्मिंग मायक्रोफोन आणि बॅकग्राऊंड म्युझिक फिल्टर करण्यासाठी इंटेलिजेंट नॉयज रिडक्शन अल्गोरिदमसह आहे.
हे ऑडिओ ग्लासेस एका चार्जवर 8 तास वापरता येतात. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ 5.2 समाविष्ट आहे. गाणं प्लेबॅक आणि टच नियंत्रणाद्वारे केले जाते. त्याचे वजन फक्त 52 ग्रॅम आहे. यामध्ये युजर्सना राउंड किंवा स्क्वेअर फ्रेमचा पर्याय मिळतो. धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी याला IP54 रेटिंगही देण्यात आली आहे.