नवी दिल्ली : स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यानुसार, त्याची खरेदीही केली जात आहे. पण या कडक उन्हात स्मार्टफोन गरम होऊन आग लागल्याची प्रकरणे समोर आली आहेत. तुमचा स्मार्टफोन तापू नये याकडे तुम्ही सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. तसे केल्यास तुमच्या स्मार्टफोनचे होणारे पुढील नुकसान टाळता येऊ शकते.
जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये अनावश्यक ऍप्स सुरु असतील ते अगोदर बंद करा. तुम्ही वापरत नसलेले अॅप्स बंद करा. बॅकग्राऊंडमध्ये चालणारे अॅप्सही फोन गरम करू शकतात. तसेच चार्जिंग करताना तुम्ही फोनचा वापर करणे पूर्णपणे टाळा. कारण यामुळे फोन जास्त गरम होऊ शकतो. जर तुमचा फोन गरम होत असेल तर कव्हर काढून टाका. जेणेकरून उष्णता कमी होऊ शकेल.
याशिवाय, थेट सूर्यप्रकाशापासून बचाव करा. फोनला थेट सूर्यप्रकाशात आणू नका. कारण यामुळे फोनचे तापमान वाढू शकते. वेळोवेळी आपल्या फोनचे सॉफ्टवेअर अपडेट करा, कारण अपडेटमध्ये बऱ्याचदा बॅटरी आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी वैशिष्ट्ये असतात. तसेच पॉवर सेव्हिंग मोडचा वापर करा, ज्यामुळे फोनचा पॉवर कंझर्व कमी होतो आणि फोन गरम होत नाही.