नवी दिल्ली : नवीन स्मार्टफोन खरेदी केल्यानंतर काही महिने चांगला चालतो. पण नंतर त्याच्या वापरानुसार फोन स्लो होऊन जातो. तुमचाही फोन जुना झाला असेल तर काही टिप्स आहेत त्या फॉलो केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते. त्यामुळे तुमचा फोनही फास्ट चालू शकेल.
तुम्हाला तुमचा स्मार्टफोन लवकर खराब होण्यापासून वाचवायचा असेल तर वेळोवेळी सॉफ्टवेअर अपडेट्स करत राहा. असे केल्याने फोनच्या रॅम आणि स्टोरेजवर अनेकदा चांगला परिणाम होऊ शकतो. तसेच, सॉफ्टवेअर अपडेट्समुळे फोनमध्ये अनेक वेळा नवीन फीचर्स जोडले जातात. ज्यामुळे फोन पुन्हा एकदा फास्ट आणि स्मूथ बनतो.
जर तुमचा स्मार्टफोन जवळपास सहा महिने किंवा एक वर्ष झाला असेल तर तो स्लो होतो. अशा परिस्थितीत फोनमधील अनावश्यक ॲप्स डिव्हाइसमधून काढून टाकावे लागतील. फोनमध्ये विविध प्रकारचे ॲप्स असल्याने फोनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत, तुमच्या डिव्हाईसमधून अनावश्यक ॲप्स काढून टाका. असे केल्याने रॅम आणि स्टोरेजवर सकारात्मक परिणाम होतो आणि फोनची कार्यक्षमता सुधारते.
तसेच फोनसाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्याची बॅटरी. त्यामुळे फोन जंक होण्यापासून वाचवण्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. फोनची बॅटरी कधीही शून्यावर पोहोचू देऊ नका. त्याच वेळी, बॅटरी नेहमी 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करा. यामुळे फोनची बॅटरी लाईफ वाढते आणि डिव्हाईस लवकर खराब होत नाही.