नवी दिल्ली : तुमच्यापैकी अनेकांना कधीना कधीतरी नेटवर्कची समस्या आली असेल. मग ते नेटवर्क कोणत्याही कंपनीचं असो ही समस्या येतेच. काहीवेळा तर मोबाईलवर पूर्ण सिग्नल दिसूनही रेंज आपोआप गायब होते. असं तुमच्याही बाबतीत होत असेल तर आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहोत. त्याचा वापर केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते.
जर तुम्हाला नेटवर्कची समस्या आली तर तुम्ही खिडकी किंवा दरवाजाजवळ असाल तर तिथे जा आणि तुमच्या फोनचे नेटवर्क तिथे चांगले आहे का ते पाहा. बाहेर जातानाही नेटवर्क तपासा. तसेच सिग्नल बूस्टर हे एक साधन आहे जे तुमच्या फोनचे सिग्नल मजबूत करू शकते. आपण ते ऑनलाईन किंवा इलेक्ट्रॉनिक स्टोअरमधून खरेदी करू शकता. याशिवाय, फ्लाईट मोड चालू आणि बंद करा. नेटवर्क सेटिंग्जवर जा आणि आपले नेटवर्क ऑटो निवडा. त्यानंतर नेटवर्क ऑपरेटर रीसेट करा.
कोणतेही उपाय काम करत नसल्यास तुमच्या नेटवर्क ऑपरेटरशी संपर्क साधा. ते तुमच्या क्षेत्रातील नेटवर्क समस्यांबद्दल माहिती देऊ शकतात आणि उपाय देऊ शकतात. तुम्ही वरील सर्व पद्धती वापरून पाहिल्यास आणि तरीही समस्या कायम राहिल्यास तुमचे सिम कार्ड बदलून पहा. कारण, अनेकदा सिम कार्डमध्ये दोष असू शकतो.