नवी दिल्ली : इंटरनेट सेवा वापरण्यासाठी आपल्यापैकी अनेकजण Wifi राऊटर वापरत असतील. हे वायफाय राऊटर सातत्याने वापरल्याने अनेकदा स्पीडची समस्या येऊ शकते. जेव्हा हे राऊटर स्लो इंटरनेट देते तेव्हा काय करावं हे सूचत नाही. पण काही सेटिंग केल्यास नक्कीच फायद्याचे ठरू शकते. त्याचीच माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
तुमच्या राऊटरच्या माध्यमातून किती लोक Wi-Fi वापरत आहेत ते तपासा. जर बरेच लोक वाय-फाय वापरत असतील तर त्याचा स्पीडही कमी होऊ शकतो. तुमच्या राऊटरमध्ये अँटेना असल्यास, तो वेगवेगळ्या दिशेने फिरवण्याचा प्रयत्न करा. सर्वोत्तम सिग्नल मिळविण्यासाठी अँटेना सेट करा. त्यामुळे इंटरनेटचा स्पीड वाढू शकतो. तसेच तुमच्या घरातील वायफाय सिग्नल वीक असल्यास, तुम्ही वायफाय एक्सटेंडर वापरू शकता. वायफाय एक्सटेंडर सिग्नल वाढवतो आणि कव्हरेज क्षेत्रही वाढवतो.
कधीकधी राऊटर रीस्टार्ट केल्याने तात्पुरत्या समस्यांचे निराकरण होते. त्यामुळे वाय-फाय राऊटर बंद करा आणि काही सेकंद थांबा. यानंतर राऊटर पुन्हा रीस्टार्ट करा. याने स्पीडची समस्या दूर होऊ शकते. याशिवाय, घराच्या मध्यभागी राऊटर ठेवा. जेणेकरून सिग्नल सर्वत्र समान रीतीने पोहोचेल. राऊटर जमिनीवर ठेवण्याऐवजी उंचीवर ठेवा, असे केल्यास फरक जाणवू शकतो.