सध्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. त्यात WhatsApp चा वापर सर्वाधिक होताना दिसत आहे. WhatsApp हे एक इन्स्टंट मेसेजिंग ॲप जरी असले तरी याच्या युजर्सची संख्या कमी नाही. या WhatsApp च्या माध्यमातून ऑडिओ-व्हिडिओ फाईल्स शेअर करता येऊ शकतात आणि इंटरनेटच्या मदतीने ऑडिओ-व्हिडिओ कॉल करता येऊ शकतो.
यूजर्सच्या सोयीसाठी WhatsApp वर अनेक फीचर्स आहेत. परंतु, जर ते काळजीपूर्वक वापरले गेले नाहीत तर ते तुमच्यासाठी धोक्याचे ठरू शकते. WhatsApp वरून तुमचा कोणी पाठलाग करत आहे की नाही हे समजू शकणार आहे. WhatsApp वरून अनेकदा Live Location च्या मदतीने युजर दुसऱ्या व्यक्तीचा माग काढू शकतो. जेव्हा कोणी तुम्हाला भेटायला येत असेल आणि त्याला तुम्हाला शोधण्यात अडचण येत असेल तेव्हा हे फीचर उपयोगी पडते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे लाईव्ह लोकेशन त्या व्यक्तीसोबत शेअर करू शकता.
तुमचे Location शेअर करून, ती व्यक्ती तुम्हाला सहज शोधू शकते. पण, अनेकदा काही लोक त्यांचे लाईव्ह लोकेशन शेअर करतात. पण, नंतर ते बंद करायला विसरा. अशा परिस्थितीत, ती व्यक्ती तुम्हाला नंतर देखील ट्रॅक करू शकते आणि तुम्ही कुठे आहात हे जाणून घेऊ शकते. अशा परिस्थितीत तुमची गोपनीयता धोक्यात येऊ शकते. त्यामुळे तुमचं काम झाल्यावर हे फीचर बंद केल्यास पुढील धोका टाळता येऊ शकतो.