नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी Apple ने iPhone 16 लाँच केला आहे. जेव्हा हा फोन कंपनीने लाँच केला होता तेव्हा याची किंमत 79,900 रुपयांपासून सुरु झाली होती. मात्र, तुम्ही हा फोन सुमारे 10 हजार रुपयांच्या डिस्काउंटवर खरेदी करू शकता. जर तुम्ही iPhone 16 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी असणार आहे.
iPhone 16 वर ही ऑफर Flipkart किंवा Amazon वर उपलब्ध नाही. त्यापेक्षा तुम्ही हा फोन विजय सेल्समधून स्वस्तात खरेदी करू शकता. हा फोन विजय सेल्सच्या वेबसाईटवर 74,990 रुपयांच्या किमतीत लिस्ट करण्यात आला आहे. म्हणजेच यावर 4,910 रुपयांची सवलत मिळत आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही बँकेचे कार्ड किंवा कूपनही लागणार नाही. याशिवाय स्मार्टफोनवर तुम्हाला बँक डिस्काउंटही मिळत आहे.
तुम्हाला HDFC कार्डवर 4500 रुपयांची सूट मिळत आहे. तर कोटक महिंद्रा बँक 5000 रुपयांची सूट देत आहे. इतर बँकांच्या कार्डवरही ऑफर उपलब्ध आहेत. तसेच तुम्ही ICICI बँक किंवा SBI क्रेडिट कार्ड वापरत असल्यास, तुम्हाला 5000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल. पण, असे जरी असले तरी ही ऑफर केवळ पूर्ण स्वाईप किंवा कमी किमतीच्या EMI सह उपलब्ध असणार आहे.