नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी Apple ने ऑपरेटिंग सिस्टिमची पाचवी डेव्हलपर बीटा एडिशन म्हणजेच iOS 18 आणली आहे. Apple ने त्यात अनेक बदल केले आहेत. नवीन iOS मुळे iPhone वर व्हॉईस कॉल रेकॉर्ड करता येणार आहे. याचा फायदा हजारो युजर्सना होणार आहे.
कॉल रेकॉर्डिंगचे हे फीचर सध्या बीटा स्टेजमध्ये आहे. Apple च्या नवीन iOS 18 अपडेटमध्ये युजर्स कॉल रेकॉर्डिंग फीचर्स कायमचे बंद करू शकतात. जर युजर्सला हवे असल्यास त्यांना डिव्हाईसच्या सेटिंग्जमध्ये जाऊन हे फीचर चालू करावे लागणार आहे. पण युजर्सना ऑटो रेकॉर्डिंगची सुविधा मिळणार नाही. अशावेळी जर युजर्सला विशिष्ट फोन कॉल रेकॉर्ड करायचा असेल तर त्याला स्वतः करावे लागणार आहे.
iPhone मध्ये अशाप्रकारे करता येऊ शकतो कॉल रेकॉर्ड
– सर्वप्रथम, आयफोनच्या कॉल मेनूवर जा. यानंतर उजव्या बाजूला ऑडिओ वेव्ह सारखा आयकॉन दिसेल, त्यावर क्लिक करा.
– हे केल्यानंतर, चालू फोन कॉलचे रेकॉर्डिंग दोन ते तीन सेकंदांनंतर सुरू होईल.
– ॲपलच्या म्हणण्यानुसार, कॉल रेकॉर्ड करण्यापूर्वी, हा फोन कॉल रेकॉर्ड होत असल्याची माहिती समोरच्या व्यक्तीला देखील दिली जाणार आहे.
– फोन कॉल डिस्कनेक्ट झाल्यानंतर, सर्व रेकॉर्ड केलेले संभाषणे Notes ॲपमध्ये उपलब्ध होतील.