सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अशी ओळख असलेल्या Instagram ने एक नवीन फीचर आणलं आहे. इन्स्टाग्रामच्या या नवीन फीचरमुळे यूजर्स त्यांच्या प्रोफाईलमध्ये म्युझिक ॲड करू शकतील. इन्स्टाग्रामने या नवीन फीचरची माहिती एका रिलीजच्या माध्यमातून दिली आहे.
इन्स्टाग्रामने त्यामध्ये म्हटले की, आता सर्व युजर्सना त्यांच्या प्रोफाईलमध्ये 30 सेकंदांचे म्युझिक अर्थात गाणे जोडता येणार आहे. एकदा म्युझिक जोडल्यानंतर युजर्सने ते काढून टाकल्याशिवाय किंवा बदलल्याशिवाय ते काढले जाणार नाही. इन्स्टाग्राम प्रोफाईलमध्ये गाणं अथवा म्युझिक कसे जोडायचे हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.
– प्रथम Instagram ॲप अपडेट करा.
– आता ‘प्रोफाईल इडिट करा’वर क्लिक करा.
– यानंतर ‘तुमच्या प्रोफाईलमध्ये गाणं जोडा’वर क्लिक करा.
– आता तुमचे आवडते गाणे निवडा.
– आता तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये गाण्याचा कोणता भाग जोडायचा आहे ते निवडा.
अशा पद्धतीने तुम्हाला गाणं जोडता येणार आहे.