नवी दिल्ली : सध्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर वाढला आहे. त्यात इन्स्टाग्रामच्या युजर्सच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. त्यामुळेच कंपनीकडून अनेक नवनवीन फिचर्स आणण्याचा प्रयत्न असतो. असे असताना आता इन्स्टाग्राम एक नवं फिचर आणण्याच्या तयारीत आहे. या नव्या फिचरचा फायदा असंख्य युजर्संना होणार आहे.
सोशल मीडिया ॲप इन्स्टाग्राम एआय स्टुडिओ नावाच्या नवीन फिचरवर काम करत आहे. Instagram च्या AI स्टुडिओच्या मदतीने युजर्स स्वतःचे AI व्हर्जन तयार करू शकतील. याबाबत मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी अलीकडेच त्यांच्या ब्रॉडकास्ट चॅनेलवर या फिचरची घोषणा केली. सध्या हे फीचर अमेरिकेतील बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे.
मेटाच्या मते, हे फिचर लाँच केल्यानंतर ज्या युजर्सच्या फॉलोअर्सची संख्या चांगली आहे ते स्वतःचे AI व्हर्जन तयार करू शकतील. त्यानुसार, क्रिएटर्स मेसेजना उत्तर देण्यासाठी आणि ग्रुपशी संवाद साधण्यासाठी त्यांचे AI व्हर्जन वापरण्यास सक्षम असतील. नवीन अपडेटनंतर जेव्हा तुम्ही ज्या अकाउंटचे AI व्हर्जन लाईव्ह असेल त्या अकाउंटला मेसेज कराल, तेव्हा तुम्हाला एक पॉपअप सूचना मिळेल की हे उत्तर AI ने जनरेट केलेले आहे.