मुंबई: भारतात विक्री करण्यात आलेल्या जवळपास ८० टक्के स्मार्टफोन्सची किंमत ३०,००० रुपयांपेक्षा कमी आहे, पण अधिकाधिक ग्राहक प्रीमियम स्मार्टफोन्सचा अवलंब करत आहेत, ज्यामुळे फोल्डेबल्ससारख्या सर्वोत्तम उत्पादनांच्या विकासाला गती मिळत आहे.
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सच्या मोबाइल एक्स्पेरिअन्स बिझनेसचे अध्यक्ष व प्रमुख टीएम रोह म्हणाले की, भारत जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन बाजारपेठ आहे आणि सॅमसंगसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. भारतीय बाजारपेठ फोल्डेबल्स अपवादात्मकरीत्या वाढत असलेल्या बाजारपेठांपैकी एक आहे. त्यामध्ये गॅलॅक्सी फोल्डेबल्सना अधिक प्राधान्य दिले जात आहे. आम्हाला यंदा बाजारपेठेत मागणी वाढण्याची अपेक्षा आहे, तसेच आम्हाला भारतातील ग्राहक नवीन गॅलॅक्सी झेड फ्लिप६ आणि गॅलॅक्सी झेड फोल्ड६ चा अवलंब करण्याची देखील अपेक्षा आहे, जेथे या स्मार्टफोन्समध्ये गॅलॅक्सी एआयचा समावेश करण्यात आला आहे, जे फोल्डेबल्ससाठी ऑप्टिमाइज करण्यात आले आहे.
सॅमसंगने नुकतेच गॅलॅक्सी झेड फोल्ड६ आणि झेड फ्लिप६ फोल्डेबल स्मार्टफोन्स लाँच केले, ज्यांना भारतात उत्तम सुरुवात मिळाली आहे, जेथे फक्त २४ तासांमध्ये फोल्डेबल्सच्या मागील जनरेशनच्या तुलनेत ४० टक्के उच्च प्री-ऑडर्सची नोंद झाली आहे. सिक्स्थ जनरेशन गॅलॅक्सी फोल्डेबल्समध्ये सॅमसंगचे एआय टूल्सचे सूट गॅलॅक्सी एआयची शक्ती आहे, जे संवादांमधील व्यत्ययांना दूर करण्यास मदत करते आणि ग्राहकांची सर्जनशीलता व उत्पादनक्षमतेला नव्या उंचीवर घेऊन जात आहे.