नवी दिल्ली : सध्या WhatsApp, Instagram, X (Twitter), Facebook (Meta) यांसारखी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. त्यानुसार, यांचा युजर्सही मोठा आहे. त्यात आता Instagram ने एक मोठी घोषणा केली आहे. आता फक्त शॉर्ट व्हिडिओच व्हायरल होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
अनेक युजर्सकडून शॉर्ट व्हिडिओ बनवले जात आहेत. अशा युजर्ससाठी हा चांगला निर्णय मानला जात आहे. मात्र, फक्त शॉर्ट व्हिडिओच बनवता येईल, असे नाही. मोठे अर्थात लेंदी व्हिडिओही यापुढे अपलोड करता येणार आहे. याबाबत कंपनीचे ॲडम मोसेरी यांनी सांगितले की, छोट्या अर्थात शॉर्ट व्हिडिओंना प्राधान्य दिले जाईल. जेव्हा एखादा युजर इन्स्टाग्रामवर येईल तेव्हा तो फक्त शॉर्ट व्हिडिओंद्वारे येतो. आतापर्यंत व्हायरल झालेले बहुतांश व्हिडिओ शॉर्ट्सचे आहेत.
तसेच तुम्ही 10-20 मिनिटांचे व्हिडिओ पाहाल तर तुम्हाला तुमच्या मित्रांचे खूप कमी कंटेंट दिसतील. परिणामी, लोकं मोठे व्हिडिओही शेअर करत नाहीत. अशा परिस्थितीत, लेंदी व्हिडिओंवर रिसोर्सेस वापरण्याचा कोणताही उपयोग नाही. त्यामुळे आता फक्त शॉर्ट व्हिडिओच व्हायरल होतील, असे कंपनीकडून सांगण्यात आले.