नवी दिल्ली : सध्याच्या इंटरनेटच्या युगात सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. त्यात अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरु आहेत. X अर्थात ट्विटर वापरणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. याच X युजर्सना आता नवा बदल दिसणार आहे. यापूर्वी लाईक हा पर्याय आपल्याला पाहिला मिळत होता. मात्र, आता त्यासोबतच डिसलाईक हा पर्यायही दिसणार आहे.
एलॉन मस्क यांच्याकडे X चा मालकी हक्क आल्यापासून त्यांच्याकडून त्यात अनेक बदल करण्यात आले आहेत. ज्यात ब्लू टिक, सशुल्क सेवा यांचा समावेश आहे. त्यात आता डिसलाईकचा पर्याय युजर्सना मिळणार आहे. X वरील डिसलाईक पर्यायाबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. मात्र, आता हा पर्याय लवकरच दिसणार आहे. X चा डिसलाईक पर्याय प्रत्यक्षात Dislike म्हणून ओळखला जाणार आहे.
Reddit चा Dislike पर्याय डाउनव्होट आयकॉनसह येणार आहे. रिपोर्टनुसार, X च्या iOS ॲपच्या बीटा व्हर्जनवर डिसलाईकचा पर्याय दिसणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे जर आपल्याला X वर कोणताही कंटेंट आवडला नसेल तर आपण डिसलाईक अर्थात नापसंती दर्शवू शकतो.