मुंबई : हल्ली स्मार्टफोनने आपले विश्व अक्षरश: व्यापलं आहे. आपले वीज बिल भरणे, ऑनलाईन शॉपिंग, एलआयसीचे हप्ते असं सर्वकाही आपण मोबाईलद्वारेच करत आहोत. अशात जर तुमच्या स्मार्टफोनचे इंटरनेट स्लो झालं तर अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. परंतू आपल्या स्मार्ट फोनच्या काही सेटिंगमध्ये बदल करून आपल्या फोनचे इंटरनेट आपण सुपरफास्ट करु शकतो. तर चला जाणून घेऊयात स्मार्ट फोनचे इंटरनेट फास्ट कसं करता येईल.
- जर तुमचे इंटरनेट स्लो झालं असेल तर आधी फोनची सेटिंग तपासा.
- फोनच्या सेटिंगमध्ये नेटवर्क सेटिंगमध्ये जा आणि 5G किंवा ऑटो म्हणून पसंतीचे नेटवर्क निवडा.
- याशिवाय, नेटवर्क सेटिंगमध्ये ऍक्सेस पॉइंट नेटवर्क (APN) सेटिंग देखील तपासा, कारण वेगासाठी योग्य APN असणे महत्त्वाचे आहे.
- APN सेटिंग्ज मेनूवर जा आणि सेटिंग डीफॉल्टवर सेट करा.
- फोनमध्ये उपस्थित असलेल्या सोशल मीडियावर लक्ष ठेवा. Facebook, X आणि Instagram सारखे अॅप्स वेग कमी करतात आणि अधिक डेटा वापरतात. त्यांच्या सेटिंगवर जा आणि ऑटो प्ले व्हिडिओ बंद करा.
- तसेच फोनचा ब्राउझर डेटा सेव्ह मोडमध्ये सेट करा.
सर्वकाही करूनही तुम्हाला स्पीड मिळत नसेल तर तुमच्या फोनची नेटवर्क सेटिंग रीसेट करा. डीफॉल्ट नेटवर्क सेटिंगवर चांगली गती मिळण्याची सर्व शक्यता आहे.