नवी दिल्ली : सध्या फोनपे, गुगल पे आणि पेटीएम यांसारखे अनेक ऑनलाईन पेमेंट पर्याय उपलब्ध आहेत, ज्याद्वारे त्वरित पेमेंट करता येते. पण अनेकदा लोक ऑनलाईन पेमेंट करायला विसरतात. जर तुमच्यासोबतही असे घडले की तुम्ही एखाद्या विशिष्ट तारखेला पेमेंट करायला विसरलात, तर आजपासून तुमची समस्या संपू शकते. कारण, तुम्हाला पेमेंट रिमायंडर पर्याय यूपीआयमध्येच मिळणार आहे.
फोनपे अॅपच्या मदतीने ऑनलाईन पेमेंट रिमायंडर पर्याय चालू करता येऊ शकतो. या फीचर्सच्या मदतीने, तुम्ही तुमचे पेमेंट एका विशिष्ट तारखेला ते लक्षात न ठेवता सहजपणे करू शकाल. हे फीचर सध्या अँड्रॉईड अॅप युजर्ससाठी उपलब्ध आहे. याला शेड्यूल्ड पेमेंट पर्याय म्हणूनही ओळखले जाते.
पेमेंट रिमायंडर पर्याय कसा सेट करायचा?
– सर्वप्रथम तुम्हाला PhonePe पर्याय उघडावा लागेल. यानंतर तुम्हाला प्रोफाईल पर्यायावर टॅप करावे लागेल.
– यानंतर, तुम्हाला सेटिंग्ज आणि प्राधान्ये पर्यायावर टॅप करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला रिमायंडर्स पर्यायावर टॅप करावे लागेल.
– यानंतर तुम्हाला Add Reminder पर्यायावर टॅप करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला कोणाला पैसे द्यायचे आहेत आणि किती रक्कम द्यायची आहे याची माहिती द्यावी लागेल. यासाठी तुम्ही दैनिक, साप्ताहिक किंवा मासिक पर्याय निवडू शकाल.
– यानंतर तुम्हाला एक तारीख निवडावी लागेल. तसेच तुम्हाला पर्यायी संदेश निवडावा लागेल आणि नंतर तो सेव्ह करावा लागेल.
– यानंतर तुमचे पेमेंट एका निश्चित तारखेसाठी सेट केले जाईल.