नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी HiSense ने आपला नवीन HiSense Smart TV S59 लाँच केला आहे. हा स्मार्ट टीव्ही 75 इंचाचा असून, यामध्ये इंटेलिजेंट मोशन डिटेक्शन सिस्टिमही देण्यात आले आहे. कंपनीने टीव्हीमध्ये AI इंटेलिजेंट फार-फील्ड व्हॉईस कंट्रोलदेखील दिला आहे. या माध्यमातून अनेक प्रकारच्या भाषा ओळखू आणि समजू शकतो.
HiSense च्या या Smart TV मध्ये सर्वोत्तम कलर्स कव्हरेजचा सपोर्ट आहे. डिस्प्लेमध्ये 1.06 डेल्टा ई-सपोर्ट आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. कंपनीने टीव्हीमध्ये एआय इंटेलिजेंट फार-फील्ड व्हॉईस कंट्रोलदेखील दिला आहे. टीव्हीमध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज आहे. साऊंडसाठी यात दोन इंटर्नल स्पीकर्स देण्यात आले आहेत जे 2.1 चॅनल सेटअपमध्ये येतात. त्यांचे एकूण पॉवर आऊटपुट 60W असल्याचे म्हटले जाते.
कनेक्टिव्हिटीसाठी, यात 3 HDMI पोर्ट, कोएक्सियल, अँटेना, USB-A 3.0 आणि USB- A 2.0 सपोर्ट आहेत. कंपनीच्या मते, यात RJ45 नेटवर्क पोर्टदेखील आहे. सध्या हा स्मार्ट टीव्ही ऑनलाईन सर्वच ठिकाणी उपलब्ध जरी नसला तरी याची किंमत 47,999 रुपयांपर्यंत असणार आहे.