नवी दिल्ली : लॅपटॉप वापरताना तो स्लो होणे ही आता सामान्य बाब झाली आहे. नवीन लॅपटॉप आणला की तो चांगला स्पीडमध्ये चालतो. मात्र, जसजसा वापर वाढत जातो तसतसा त्याच्या स्पीडवर परिणाम होतो. तुम्हीही वर्षानुवर्षे लॅपटॉप वापरत असाल, पण आता तुमचा लॅपटॉप किवा संगणक पूर्वीसारखा वेग देत नसेल, तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात.
लॅपटॉप स्लो झाल्यास टेंप फाईल्स अर्थात टेम्पररी फाईल्स डिलिट कराव्या लागतात. जेव्हा तुम्ही कोणतेही ऍप्लिकेशन किंवा फाईल उघडता तेव्हा सिस्टिममध्ये एक टेम्प फाईल तयार होऊ लागते. या टेम्प फाईल्समुळे लॅपटॉपचा वेग मंदावायला लागतो, कमी स्पीडमुळे काम करताना अडचणी येतात. हार्ड डिस्कमध्ये साठवलेल्या या टेम्प फाईल्स वेळोवेळी साफ करत राहावे.
लॅपटॉपवरील तात्पुरत्या फाईल्स साफ करण्यासाठी, Windows + R एकत्र दाबा, असे केल्याने Run कमांड बॉक्स उघडेल. कमांड बॉक्स उघडल्यानंतर, तुम्हाला %temp% टाइप करून शोधावे लागेल. ही कमांड लिहून सर्च करताच तुमच्या समोर टेम्प फाईल्स उघडतील, तुम्ही त्या सर्व एकत्र निवडून Ctrl + A दाबून डिलीट करू शकता.