नवी दिल्ली : सध्या टेक्नॉलॉजीच्या युगात अनेक गॅजेट्स वापरले जातात. त्यात कोणतंही काम जरी असेल तर Gmail चा वापर केला जातो. हाच Gmail तुमच्यासाठी आवश्यक देखील असतो. मात्र, काही हॅकर्स याकडे डोळा ठेऊन असतात. त्यानुसार, काही संकेतही मिळतात. त्याकडे लक्ष दिल्यास पुढील धोका टाळता येऊ शकतो.
आता सायबर गुन्हेगार Gmail अकाउंटच्या माध्यमातून घोटाळे करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी तो आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (एआय) मदत घेत आहे. युजर्सला त्यांचे Gmail अकाउंट स्वतः सुरक्षित करू शकतात. यासाठी काही खबरदारी घेणे आवश्यक आहे. हॅकर्स Gmail अकाउंट हॅक करण्यासाठी फिशिंग ई-मेल किंवा मेसेज वापरतात. यासाठी ते सरकारी एजन्सी किंवा बँकेसारख्या नामांकित संस्थेतील असल्याचा दावा करतात.
फिशिंगचा उद्देश तुमच्या अकाउंटचे डिटेल्स आणि पासवर्ड चोरणे हा असू शकतो. याशिवाय मेसेजमध्ये दिलेल्या लिंकद्वारे तुमच्या डिव्हाईसवर मालवेअर डाउनलोड करण्यास सांगितले जाते. त्याने मालवेअर स्कॅमर्सना तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये प्रवेश करून माहिती अर्थात डाटा हॅक करता येऊ शकता. यामध्ये काही बदल दिसल्यास तुमचं अकाउंट झाल्याची शक्यता असू शकते.