नवी दिल्ली : सध्या टेक्नॉलॉजीच्या युगात अनेक गॅजेट्सचा वापर केला जात आहे. त्यात इंटरनेटचा वापरही वाढताना दिसत आहे. तेव्हा कोणतीही माहिती हवी असल्यास आपण Google Search चा आधार घेतो. पण आता याच गुगलला टक्कर देण्यासाठी एक नवं अॅप/साईट लाँच केली आहे.
OpenAI ने अखेर SearchGPT हा गुगल सर्चला पर्याय म्हणून लाँच केला आहे. OpenAI ने आपल्या SearchGPT बाबत दावा केला की, हा एक सर्च पर्याय कोणत्याही सर्च इंजिनपेक्षा अधिक वेगवान असणार आहे. इतकेच नाहीतर युजर्सना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं रिअल टाईममध्ये मिळणार आहे. OpenAI सध्या SearchGPT ची टेस्टिंग सुरु आहे. यासाठी कंपनीने 10,000 लोकांचा ग्रुपदेखील केला आहे.
असे असले तरी कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नाही. मात्र, भविष्यात चॅट जीजीपीटीसह सर्चजीपीटीची ओळख होईल, अशी अपेक्षा आहे. SearchGPT थेट Google शोध इंजिनशी स्पर्धा करणार असल्याचेही सांगण्यात आले. सध्या सर्वांनाच हा पर्याय मिळणार नाही. मात्र, याची टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर अधिकृतरित्या सर्वांनाच हे वापरता येणार आहे.