नवी दिल्ली : सध्या Google ने Pixel 9 सीरीज नुकतीच लाँच केली. त्यात आता हा स्मार्टफोन भारतातही लवकरच लाँच केला जाणार आहे. कंपनीने ऑगस्ट महिन्यात या सीरीजचे तीन हँडसेट लाँच केले होते. यापूर्वी भारतात फक्त Pixel 9 आणि Pixel 9 Pro XL लाँच करण्यात आले होते. त्यानंतर आता Pixel 9 Pro देखील लवकरच भारतात विक्रीसाठी उपलब्ध केला जाणार आहे.
Pixel 9 Pro भारतात 17 ऑक्टोबरपासून उपलब्ध होणार आहे. भारतात या हँडसेटची किंमत 1,09,999 रुपये असणार आहे. Pixel 9 Pro XL प्रमाणे, हा हँडसेट पोर्सिलेन, रोझ क्वार्ट्ज, हेझ आणि ऑब्सिडियन कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल. भारतात हा हँडसेट 16GB + 256GB मॉडेलमध्ये मिळणार आहे. Pixel 9 Pro चे फीचर्स आणि डिझाइन Pixel 9 Pro XL सारखेच दिसत आहे. दोन्हीमधील फरक म्हणजे बॅटरी आणि स्क्रीनचा आकार हाच फरक असणार आहे.
Google Pixel 9 Pro चे फीचर्स…
Google Pixel 9 Pro मध्ये 6.3-इंच (1280 x 2856 pixels) 1.5K LTPO AMOLED डिस्प्ले आहे. यात 3000 निट्स पीक ब्राइटनेस आहे. स्क्रीनच्या प्रोटेक्शनसाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 आहे. यात अल्ट्रासोनिक डिस्प्ले आहे.
Google Pixel 9 Pro प्रोसेसर कोणता?
या गुगल हँडसेटमध्ये Tensor G4 चिपसेटसह Titan M2 सुरक्षा चिप आहे. भारतात येणाऱ्या हँडसेटमध्ये 16GB LPDDR5X रॅम आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज असणार आहे. हा स्मार्टफोन Android 14 सह मिळत आहे.