पुणे प्राईम न्यूज डेस्क: तुम्हीही गुगल मॅप वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. गुगलने भारतीय वापरकर्त्यांसाठी एक मोठे फीचर जाहीर केले आहे. Google Maps चे स्ट्रीट व्यू फीचर आणखी मनोरंजक बनणार आहे. गुगल मॅप्समध्ये लाईव्ह व्यू वॉकिंग दिसणार आहे.
याशिवाय गुगल मॅप्समध्ये गुगल लेन्सचा सपोर्ट असेल. गुगल मॅपबाबत गुगलने म्हटले आहे की, आता मुंबई आणि कोलकाता लोकल ट्रेनचे अपडेट्स त्यांच्या व्हेअर इज माय ट्रेन अॅपवर उपलब्ध असतील. हे सर्व फिचर्स गुगल मॅप्सच्या अँड्रॉइड व्हर्जनमध्ये प्रथम येतील. नंतर ते iOS साठी देखील उपलब्ध होतील.
पहिल्या टप्प्यात 3,000 शहरांसाठी लाइव्ह व्ह्यू वॉकिंग फीचर जारी केले जाईल.
गुगलने म्हटले आहे की, Google Maps चे लाइव्ह व्ह्यू वॉकिंग फिचर सुरुवातीला 3,000 शहरांसाठी जारी केले जाईल. या फीचरचा फायदा असा आहे की, ज्या रस्त्यावर लोक मोठ्या संख्येने चालतात त्या रस्त्यावरही तुम्हाला जामची आगाऊ माहिती मिळू शकेल. जानेवारी 2024 मध्ये Google Maps वर लेन्स सपोर्ट उपलब्ध होईल.
Google Maps मध्ये इंधन कार्यक्षम फीचर देखील येणार आहे, ज्यानंतर Google Maps तुम्हाला त्या मार्गांबद्दल सांगेल ज्यावर तुमची कार कमी इंधनाचा वापर करेल. Google Maps हिरव्या पानांच्या चिन्हाद्वारे इंधन कार्यक्षम मार्ग दर्शवेल.