नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर गुगलने आपले AI व्हिडिओ टूल Google Vids लाँच केले आहे. Google Vids हे फिचर सध्या Google Workspace साठी ऑफर केले असून, बीटा व्हर्जनमध्ये हे उपलब्ध आहे. यावर्षी एप्रिलमध्ये Google च्या Google क्लाउड नेक्स्ट इव्हेंटमध्ये Google Vids लाँच करण्यात आले होते.
Google Vids हे AI व्हिडिओ जनरेटर साधन आहे जे स्टोरीबोर्ड देखील तयार करते. याशिवाय, तुम्ही Google Vids च्या मदतीने प्रेझेंटेशन देखील करू शकता येणार आहे. Google Vids सध्या फक्त वर्कस्पेस लॅबसाठी साईन अप केलेल्या युजर्सना वापरता येणार आहे. मात्र, या फिचरच्या ग्लोबल लाँचिंगबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
गुगल डॉक्सच्या एका अधिकाऱ्याने Google Vids च्या बीटा व्हर्जनबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘कंपनीकडून Google Vids वर्कस्पेस लॅबमध्ये आणण्याचा विचार आहे. Vids हे AI-आधारित व्हिडिओ जनरेटर ॲप आहे. यात गुगल जेमिनीसाठीही सपोर्ट आहे. युजर्सना व्हिडिओसाठी त्यांचे टेम्प्लेट निवडण्याचा पर्याय देखील मिळणार आहे.