पुणे प्राईम न्यूज: गुगलचे एआय चॅट टूल गुगल बार्ड आता पूर्वीपेक्षा अधिक स्मार्ट झाले आहे. गुगल बार्डमध्ये मेमरी फीचरही आले आहे, म्हणजेच आता गुगल बार्डला तुमच्यासोबत केलेले चॅटिंगही लक्षात राहील.
गुगल बार्डसोबत केलेले संभाषण आता सेव्ह केली जातील. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही गुगल बार्ड ओपन कराल, तेव्हा तुम्हाला तुमच्या जुन्या चॅट्स दिसतील. पूर्वी असे नव्हते. नवीन फीचर खूप उपयुक्त ठरणार आहे.
उदाहरण म्हणून जर तुम्ही गुगल बार्डकडून रेसिपीची सूचना मागवली आणि तुम्हाला त्यात समाविष्ट असलेल्या कोणत्याही पदार्थाची अॅलर्जीचा असेल तर तुम्हाला गुगल बार्डला एकदाच अॅलर्जीचाबद्दल सांगावे लागेल. पुढच्या वेळी तुम्ही चॅट कराल तेव्हा, तुम्हाला कशाची अॅलर्जीचा आहे हे गुगल लक्षात ठेवेल.
गुगल बार्डचे मेमरी फिचर हे चॅटिंगच्या लेफ्ट साईडला असलेल्या मेनूमधून सुरु केले जाऊ शकते. ते डीफॉल्टनुसार उपलब्ध होणार नाही. तुम्हाला मेमरी फीचर वापरायचे आहे की नाही, हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही ते बंद करू शकता.