नवी दिल्ली : सध्या Google ने iPhone युजर्ससाठी आपले नवीन AI ॲप Gemini लाँच केले आहे. हे नवीन ॲप युजर्संना फायद्याचे ठरू शकते. हे Gemini App ॲपलच्या AI, Siri, ChatGPT आणि Google Gemini इतकेच चांगले आहे. Google ने Gemini नावाचे नवीन एआय टूल आणले आहे. हे अॅप अनेक प्रकारची कामे सुलभ करते.
तुम्ही हे अॅप iPhone वर वापरू शकता. हे अॅप अगदी फ्रीमध्ये तुम्हाला उपलब्ध असेल. अशाप्रकारे Google आपले नवीन AI तंत्रज्ञान अधिकाधिक लोकांसाठी उपलब्ध करून देत आहे. Gemini App मध्ये अनेक फीचर्स आहेत. जी सर्व प्रकारच्या लोकांसाठी उपयुक्त ठरू शकतात. या ॲपद्वारे तुम्हाला लेखन, सारांश तयार करणे, भाषा बदलणे आणि क्रिएटिव्ह कंटेंट तयार करण्यात मदत मिळू शकते.
तुम्ही काही शब्द टाईप करू शकता आणि Google Gemini तुमच्यासाठी ई-मेल, स्टोरी किंवा कोड लिहिल. हे ॲप वापरण्यास अतिशय सोपे आहे, विशेषतः फोनवर. Google Gemini अशाप्रकारे डिझाइन केले आहे की तुम्ही त्याच्याशी सामान्य भाषेत बोलू शकाल आणि ते तुम्हाला योग्य उत्तरे देईल.